दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:प पु गोळवलकर गुरुजी माध्यमिक व प्राथमिक विद्यालयात संयुक्तपणे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात साजरा झाला.
प्रथम भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष सन्मानीय डॉ सुरेंद्रभाऊ आलूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले. याप्रसंगी स्थानिक व्यवस्था मंडळाचे कार्यवाह प्रकाशसेठ चिंतावार, शालेय समिती अध्यक्षा शिल्पाताई अटकळीकर प्रमुख वक्त्या राधिका पांचाळ सदस्य नारायणसेठ पोलावार,सदस्य भागवत तमेवार माध्यमिक चे मुख्याध्यापक बाळासाहेब केंद्रे प्राथमिक मुख्याध्यापक दमन देगावकर उपस्थित होते.
कार्यक्रमात पुढे महराष्ट्र गीत वाघमारे वसंत, दीक्षित गिरीश ,सुरसेटवर अर्चना , तोटावार सुरेखा व विद्यार्थी चि. मकरंद तमेवार यांनी
गायिले .
या प्रसंगी शाळेच्या शिक्षिका राधिका पांचाळ यांनी महाराट्र दिन व कामगर दिनाचे महत्व विशद केले. संयुक्त महाराष्ट्र या नावाचा उल्लेख व मुंबईस वेगळे करून उर्वरित महाराष्ट्र करण्याचा डाव कसा लोकांनी हणून पडला हे त्यानी सांगितले. यामध्ये असलेले यशवंतराव चव्हाण यांची भूमिका स्पस्ट केली
याप्रसंगी नारायण सावकार यांनी आपली परस्थिती कशीही असली तरी जिद्द मनात बाळगून मेहनत करन्याचा सल्ला विद्यार्थ्यांना दिला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन मयुरी जोशीं यानी केले. शेवटी शांती मंत्र विभागप्रमुख कुलकर्णी स्मिता यांनी सांगितला.