दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
तालुक्यातील मौजे डोरनाळी येथे भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या हर्षोउल्हासात साजरी करण्यात आली यावेळी भंत्ते रेवत बोधी यांनी महापुरूषांचे अनमोल कार्य व त्यांनी समाजाच्या कल्याणासाठी दिले योगदान याविषयी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन केले त्यानंतर गावातील मुख्य रस्त्याने डाॅ.आंबेडकर यांच्या तैलचित्राची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात निळ व डिजे विरहित महापुरूषांचे जयघोष देत शांततेत काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांना शैक्षणीक साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात महापुरूषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आली त्यानंतर पंचरंगी ध्वजाचे ध्वजारोहन हुल्लाजी पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच निळ्या ध्वजाचे ध्वजारोहन प्रकाश पाटील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ध्वजगित मनिषाताई डोरनाळीकर यांनी गायले.सदर कार्यक्रमाचे उदघाटक म्हणुन पं.स.चे माजी उपसभापती सुभाष पाटील दापकेकर होते तर अध्यक्षस्थानी विठ्ठलराव पाटील शिंदे, प्रमुख अतिथी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष शिवशंकर पाटील कलबंरकर, सरपंच प्रतीनीधी हुल्लाजी पाटील शिंदे, उपसरपंच प्रतिनिधी प्रकाश पाटील शिंदे, तग्याळचे उपसरपंच विनायकराव झोडपे, प्रा.शैलेष शिंदे, कबनुरचे सरपंच रामदास वाघमारे, पोलिस पाटील मंगलताई शिंदे, ग्रा.प.सदस्य पिराजी देवकत्ते, ग्रा.प.सदस्या महानंदा शिंदे, मुख्याध्यापक महेंद्र आदुंरे, अंगणवाडी शिक्षिका सीमाताई पांचाळ, आण्णाराव निळकंठे, सुनिल बिरादार, गणेश पाटील, व्यंकटराव कंठाळे, प्रल्हाद शिंदे, योगेश शिंदे, बालाजी कंठाळे, भुंजग देवकत्ते, विठ्ठल घटेंवाड, विठ्ठलराव पांचाळ, विठ्ठल कांबळे, तय्यब तांबोळी, अमोल देवकत्ते यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन पत्रकार महेताब शेख यांनी केले, प्रस्ताविक माजी सरपंच विद्यासागर डोरनाळीकर यांनी केले तर आभार ग्रा.पं.सदस्य व्यंकटराव गायकांबळे यांनी मानले.कार्यक्रमाचे समारोप संविधान उद्दिशिकेच्या वाचनाने करण्यात आले यावेळी विविध पक्ष व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, युवक, महिला व चिमुकल्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रम यशस्वितेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, सयोंजक व सर्व पदाधिका-यांनी परिश्रम घेतले.