दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
१ मे रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या निमित्ताने कळंब येथील अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाच्या प्रांगणात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर,एन. ए.इंगळे ,यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी सह दिवाणी न्यायाधीश क स्तरआर. पी.बाठे ,तिसरे सह निवाणी न्यायाधीश क स्तर एम.ए. शेख कळंब वकील संघाचे अध्यक्ष ॲड डि.एस. पवार, कळंब पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश साबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक रंगनाथ जगताप, पोलिस उपनिरीक्षक पुजरवाड, मालसुरे, तसेच न्यायालयाचे कर्मचारी व वकील संघाचे सदस्य उपस्थित होते यावेळी कळंब पोलिसांकडून पोलिस उपनिरीक्षक श्रीमती वर्षा साबळे व गार्डस कडून सलामी देण्यात आली