दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
============================
सह्याद्री शाळेतील विद्यार्थ्यांनी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले त्यामध्ये सह्याद्री इंग्लिश स्कूल लोहा व सह्याद्री प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय पारडी या दोन्ही शाळेतील विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेमध्ये पात्र ठरले आहेत.सह्याद्री इंग्लिश स्कूल लोहा या शाळेतील वर्ग 5 वीचे 17 विद्यार्थी स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले आहेत तर सह्याद्री प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय पारडी या शाळेतील वर्ग 8 वीचे 5 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. सह्याद्री इंग्लिश स्कूल या शाळेतून वर्ग पाचवी चे विद्यार्थी आरव चंद्रकांत वाडकर, श्रावणी संदीप सोनवळे, सह्याद्री सुदर्शन शिंदे, अर्णव गोविंद मोरे, वरद संजय कुमार जाधव, निर्जरा सोनाजी देशमाने, गुंजन विकास कोटलवार, शरयू हनुमंत हावरगे, सिद्धी सच्चिदानंद मल्लुरवार, वेदांत शिवकुमार मोरे, पंकज तिरुपती पवार, समर्थ सुभाष आंबेकर, पियुष सोपान तोरे, अनुष्का गजानन बेंद्रे, सोहम शशिकांत शेटे, गणेश माधव पोषट, केदार धोंडीबा भस्के हे विद्यार्थी वर्ग पाचवीतून स्कॉलरशिपसाठी पात्र ठरले आहेत तर सह्याद्री प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय पारडी या शाळेतील वर्ग 8 वी तुन सुमित शिवाजी राठोड, अनुष्का बालाजी वाघमारे, प्रार्थना दत्तात्रेय चौडेकर, शिवकुमार उमाकांत शेटे, शिवम माधव लोखंडे हे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत.या पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे मन भरून कौतुक शाळेचे संचालक सुदर्शन शिंदे संचालिका जय श्री शिंदे सह्याद इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक नंदकिशोर मेकाले सह्याद्री इंग्लिश स्कूलचे सुपरवायझर साई कुमार दहिवाळ, सह्याद्री प्राथमिक ते उच्च माध्यमिक विद्यालय पारडीचे मुख्याध्यापक नागेश हिरास, उपमुख्याध्यापिका सुप्रिया वाडेवाले प्री प्रायमरीच्या मुख्याध्यापिका रुक्मिणी धोंडगे व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांनी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देखील दिल्या.