दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
सामान्य माणसाच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारे लोहा येथील निर्भिड पत्रकार म्हणून ओळखले जाणारे आमचे मित्र पत्रकार केशवराव पाटील पवार यांचा आज दि.३ एप्रिल रोजी वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
लोहा शहरातील जुना लोहा येथील रहिवासी असलेले पत्रकार केशवराव पाटील पवार हे पत्रकारिता क्षेत्रात येण्याअगोदर आपला शेतीचा व्यवसाय सांभाळून सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत होते.
वडील कै. मुरलीधर पाटील पवार हे महाविरण मध्ये नौकरी ला होते . गोरगरिबांना शेतकरी , शेतमजूर आदी समाजासाठी आपण काहीतरी केले पाहिजे . शासकीय प्रशासकीय स्तरावर कामे झाली पाहिजेत यासाठी त्यांनी १० वर्षांपूर्वी पत्रकारिता क्षेत्रात पर्दापण केले. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून शेतकरी शेतमजूर सामान्य माणसाचे प्रश्न सोडविण्यासाठी काम केले जे चांगले आहे ते चांगले कुठे अधिकारी, लोकप्रतिनिधी यांचे चुकत असेल कामात हलगर्जीपणा होत असेल तिथे त्यांनी आपली लेखणी निर्भीडपणे चालवून सामान्य माणसाचे प्रश्न सोडविले .
आज दि. ३ एप्रिल रोजी पत्रकार केशवराव पाटील पवार यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ईश्वर त्यांना चांगले निरोगी व दिर्घ आयुष्य देवो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.
विलास सावळे ( पञकार लोहा )