दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- तालुक्यातील असून,तमाम बहूजनांनी शिक्षणाची कास धरून समाजाचा व देशाचा उध्दार करावा असे बाबासाहेबांना अपेक्षित होते.असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश उपाध्यक्षा गणेश दादा हाके यांनी केले…..
मौजे खंडाळी येथे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून ते बोलत होते.अध्यक्षस्थानी अरविंद शेषेराव पौळ होते.तर प्रमूख पाहूणे म्हणून प्रा.युवराज धसवाडीकर,भाजपा तालुकाध्यक्ष हणमंत देवकत्ते, डॉ.सिद्धार्थकुमार सुर्यवंशी Adv रमेश गायकवाड,जनार्धन लामतूरे,मानिक जाधव आदींची प्रमूख उपस्थिती होती…
प्रारंभी महापूरूषांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले व लगेच गणेश दादा हाके यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.सामूहीक त्रिशरण पंचशिला नंतर लगेचच जाहीर सभेला सुरूवात झाली.व पूढे बोलताना गणेश दादा म्हणाले की, पिढ्यानपिढ्या येथील दलित,बहूजन, वंचित व आदीवासी समाजास शिक्षणापासून दूर ठेवले होते.मात्र डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून त्यांना हक्क व अधिकार मिळवून दिले.
तसेच मिळालेल्या हक्काने शिक्षण घेऊन आपले जीवन समृद्ध बनवावे असे आवाहनही केले.सिध्दार्थकुमार सुर्यवंशी,प्रा.युवराज धसवाडीकर,Adv रमेश गायकवाड यांची समायोचीत भाषणे झाली.गावातील लहान थोर बालकांची भाषणे झाली.मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब बलभिम कांबळे, उपाध्यक्ष प्रकाश नारायण सोनकांबळे, सचिव बुध्दभूषण चंद्रकांत कांबळे, सहसचिव मंगेश कसबे,नितिन गवळे,कोषाध्यक्ष नरसिंग सोनकांबळे व रुपेश कसबे सल्लागार तुषार कांबळे व भैय्यासाहेब कांबळे,राहूल लामतूरे, तुकाराम रायभोले, वैभव सोनकांबळे, प्रकाश गुळवे,मिथून वाघमारे, सौरभ लामतूरे, किरण सोनकांबळे,रवी ढवळे, विशाल कसबे,सुरज सोनकांबळे, गणेश मोरे, प्रताप सुर्यवंशी,शैलेश लामतूरे व समाधान रायभोले हे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सुत्रसंचालन Adv सुभाषराव सोनकांबळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बुध्दभूषण कांबळे यांनी मानले तसेच या कार्यक्रमास आदी मान्यवरांची उपस्थिती होती