दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी -दीपक कटकोजवार
महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टी च्या नव्याने जाहीर झालेल्या कार्यकारणीत माजी प्रदेशाध्यक्ष व राज्याचे विद्यमान वने मत्स्यव्यवसाय व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा चंद्रपूर-गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सोबत ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज अहिर, माजी मंत्री शोभाताई फडणवीस, वन विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, माजी आमदार प्रा.अतुल देशकर, माजी विधान परिषद आमदार जैनुद्दीन जवेरी,माजी आमदार ऍड संजय धोटे, माजी नगराध्यक्ष विजय राऊत, राजेंद्र गांधी, प्रा.कादर अब्दुल्लाह, श्रीमती विद्या देवाळकर, वसंत वारजूरकर, डॉ.श्याम हटवादे, तुषार सोम व रघुवीर अहिर यांना विशेष निमंत्रित सदस्य म्हणून तर दुसऱ्या फळीतील जिल्ह्यातील किमान 11 भाजपा नेत्यांना निमंत्रित सदस्य म्हणून सन्मान मिळाला आहे.
पुढील काही महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व या वर्षात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणा-या निवडणुका लक्षात घेऊन संघटनात्मक रचनेला सर्व समावेशक स्वरूप देण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष आमदार बावनकुळे यांनी केल्याचे दिसत आहे. त्या अनुषंगाने या नवीन रचनेत स्थानिक पातळीवरील लोकप्रिय प्रतिनिधींना प्रदेशात स्थान दिल्या गेले आहे.या नव्या रचनेने भाजपा कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे. महत्वाचे म्हणजे संघटनमंत्री म्हणून डॉ.उपेंद्र कोठेकर यांचे कडे जवाबदारी असून प्रदेश कार्यकारिणीचे निमंत्रित सदस्य म्हणन जुनेद खान,रेनुकाताई दुधे, विवेक बोढे, मनिष तुमपल्लीवार, खुशाल बोंडे, वनिता कानडे,अमीत गुंडावार,हरीष शर्मा,करण देवतळे,अनिल डोंगरे आदीं २६ शिलेदारांना संधी मिळाली आहे.