दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी –
गंगापूर (प्रतिनिधी)घाणीच्या साम्राज्य असलेल्या व सुविधा नसलेल्या इमारती मध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्याचे उदघाटन करण्यात आले असून स्लम भागात न करता पंचायत समिती आवारातील उच्चभ्रू वस्तीत दवाखाना सुरू करून रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा प्रयत्न करणा-या अधीका-यांवर कारवाईची मागणी
नागरिकांना आरोग्याच्या मूलभूत
सुविधा मोफत उपलब्ध व्हाव्यात, यासाठी राज्य सरकारने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना’ सुरू केली आहे. आपला दवाखाना योजने अंतर्गत गंगापूर येथे दोन दवाखाने मंजूर असून प्रत्यक्षात मात्र निकृष्ट दर्जाच्या व घाणीचे साम्राज्य असलेल्या पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानात एकाच दवाखान्यांचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते १ मे रोजी डिजिटल पद्धतीने करण्यात आले.
विषेश म्हणजे सदरचे हे रुग्णालय स्लम भागात सुरू केले असते तर सामान्य रुग्णांना याचा फायदा होईल परंतु तसे न करता हे उच्चभ्रू वसाहतीत चालू केल्याने या रुग्णालयात जास्त रुग्ण येणार नसल्याचे नागरिकामधुन बोलले जात आहे.
या दवाखान्यात बाह्य रुग्णसेवा,
मोफत औषधोपचार, मोफत प्रयोगशाळा तपासणी, टेलिकन्सलटेशन, गर्भवती मातांची तपासणी, लसीकरण या सेवा देण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार विशेषतज्ञ संदर्भ सेवा पुरविण्यात येईल. याचा फायदा सामान्य जनतेला नक्कीच होणार असल्याचे आरोग्य विभाग दावा करीत आहे मात्र ग्रामीण भागात प्राथमिक अरोग्य केंद्रासह उपकेंद्रामधे डॉक्टर, औषध निर्माण आधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, अरोग्य सहाय्यक, सहाय्यीका, अरोग्य सेवक, सेविका कनिष्ठ सहाय्यक तसेच कायमस्वरूपी औषधांचा तुटवडा यासह आदी सोय सुविधासह जागा रिक्त आहे त्यामुळे आजही ग्रामीण भागातील रुग्णांना खाजगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. अधीका-यांच्या भोंगळ कारभारामुळे शहरातील स्लम भागात जागा न पाहता आपला दवाखाना पंचायत समितीच्या बंद असलेल्या कर्मचारी यांच्या निवासस्थानी एका दिवसात वरवर आतील भागात सफाई करून दवाखाना सुरू केला आहे