दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी:राम चिंतलवाड
महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त दि 1 मे रोजी हिमायतनगर शहरात नालंदा बौद्ध विहारासमोर आंबेडकर चौक येथे ‘ ज्ञानदीप कोचिंग क्लासेस ‘ चा शुभारंभ हिमायतनगर चे गट शिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले.
याविषयी सविस्तर वृत्त असे कि दि 1 मे रोजी हिमायतनगर शहरात ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चा भव्य शुभारंभ करण्यात आला. यावेळी हिमायतनगर चे गटशिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य यांच्या हस्ते रिबीन कापून उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हिमायतनगर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील,तहसीलदार डी एन गायकवाड, नायब तहसीलदार अनिल ताम्हसकर, केंद्रप्रमुख गणेश कोकूलवार,रफिक सेठ, मनोहर राठोड सचिव गुरुकुल इंग्लिश स्कूल,गजानन सूर्यवंशी मुख्याध्यापक कै श्रीधरराव देशमुख विद्यालय सरसम, विजय धोबे सहशिक्षक जि. प. शाळा नेहरूनगर क्रं 2, प्रा. डॉ. संघपाल इंगळे, प्रा. डॉ गजानन दगडे हू ज पा कॉलेज, शासकीय मुलींचे वस्तीगृह चे संदीप धुताडे, राहुल भरणे हू ज पा महाविद्यालय,धोंडोपंत बनसोडे लोकस्वराज्य आंदोलन तालुकाअध्यक्ष, गंगाधर गायकवाड महाराष्ट्र पर्व लाईव्ह न्युज मुख्य संपादक, नागोराव शिंदे जेष्ठ पत्रकार,पत्रकार राम चिंतलवार,सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड,प्रशांत राहुलवाड संपादक रिपब्लिक 24 न्यूज, मुन्नाभाऊ शिंदे सामाजिक कार्यकर्ते हे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना वंदन करून करण्यात आली. यावेळी ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे उदघाटन रिबीन कापून हिमायतनगर तालुक्याचे गट शिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य यांच्या हस्ते सर्व उपस्थित मान्यवरासह करण्यात आले. यानंतर उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर गट शिक्षणाधिकारी शिवानंद शिवाचार्य यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले कि शिक्षण क्षेत्र हे पवित्र आणि ज्ञानदानाचे क्षेत्र आहे. युवा पिढीने स्वयंस्फूर्तीने या क्षेत्रात काम करावे व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे.संचालक डी एन गुंडेकर सर व विजय वाठोरे सर यांचे कौतुक करून त्यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यानंतर मुख्याध्यापक गजानन सूर्यवंशी सर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी माझे विद्यार्थी पुढे होऊन ज्ञानदानाचे कार्य करताना अभिमान वाटतो.सर्वांनी जिद्दीने शिकले पाहिजे. आई वडिलांची स्वप्न पूर्ण केली पाहिजेत. तरच त्यांच्या कष्टाचे चीज आहे.या क्लासेस चे दोन्ही संचालक खडतर प्रवासातून आलेले आहेत. त्यांना सर्व परिस्थितीची जाण आहे त्यामुळे ते पालकांच्याही अपेक्षा नक्कीच पूर्ण करू शकतील व एक नवा इतिहास घडवू शकतील यात शंका नाही. तसेच संचालक यांचे अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यानंतर सहशिक्षक विजय धोबे यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.
यानंतर सामाजिक कार्यकर्ते दिनेश राठोड यांनी संचालकांना शुभेच्छा देत पालकांची परिस्थिती पाहून गरीब होतकरू विद्यार्थ्यानां फी मध्ये सवलत द्यावी व गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावे असे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडोपंत बनसोडे यांनी केले. तर आभार प्रदर्शन ज्ञानदीप कोचिंग क्लासेस चे संचालक विजय वाठोरे सर यांनी केले.
या कार्यक्रमाला सायप्रस इंग्लिश मेडीयम चे मुख्याध्यापक दिनेश राठोड सर,वैभव शिंदे, लक्ष्मण टेकाळे,ओमकार रेखावार,राज गोडसेलवार, ओमसाई गुंडेकर, पालक बाबाराव बनसोडे,पालकवर्ग, विद्यार्थी -विद्यार्थिनी तसेच आदी मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.