दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -अवधूत शेंद्रे
आष्टी(श)वर्धा(प्रतिनिधी):येथील न.पं.कार्यालयाचा अनागोंदी कारभार नियमबाह्य पद्धतीने सुरू असून त्याची चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करून न्याय देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते योगेश सोनटक्के यांनी आयुक्त तथा संचालक नगर परिषद प्रशासन संचालनालय मुंबई व जिल्हाधिकारी वर्धा येथे केली आहे दिलेल्या तक्रारीत पुढे म्हटले आहे की, आष्टी न.पं.कार्यक्षेत्रात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरीवस्ती सुधार योजने अंतर्गत प्रभाग क्रमांक १६ मध्ये एकूण ५ विंधन विहिरीची कामे मे २०२३ मध्ये अंदाजपत्रकाच्या नियमाला बगल देत अर्धवट करण्यात आले आहे व त्या कामाची पूर्ण देयके पाणी पुरवठा कनिष्ठ अभियंता हरी ऊइके यांनी नियमबाह्य पद्धतीने काढल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे तर बांधकाम विभागातील तांत्रिक सल्लागार हे पद नियमित तांत्रिक कर्मचारी नियुक्त असताना मात्र नियमबाह्यपद्धतीने श्यामल मोंढे सन २०१९ पासून कार्यरत आहे सदर पदाची नियुक्ती ही नगरपंचायतच्या आस्थापनावर तांत्रिक कर्मचारी नसल्यास पदावर ठेवता येते पण आष्टी न.पं ला तांत्रिक कर्मचारी नियमित वर्ग असूनही सदर तांत्रिक सल्लागाराची नियुक्ती
नियमबाह्य व बेकायदेशीररित्या कायम आहे असे स्थायी निर्देश मध्ये नमूद असताना मात्र नगर पंचायत कार्यालयाने त्यांना कामावर ठेवले आहे त्यामुळे त्यांचेवर न.पं ला जमा झालेल्या कर निधीतून त्यांचे मानधनावर लाखो रुपये बेकायदेशीररित्या सराईतपणे खर्च होत आहे त्यामुळे यातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा आष्टी न.पं.कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा योगेश सोनटक्के यांनी दिला आहे सदरचे प्रकरण पुढे काय वळण घेते याकडे आष्टीवासियांचे लक्ष लागले आहे