दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर:प.पू.योगऋषी स्वामी रामदेव जी महाराजांच्या सानिध्यात तथा पतंजली योगपीठ,हरिव्दार येथुन शास्त्रशुध्द प्रशिक्षण घेतलेल्या तज्ञ योगप्रशिक्षकांच्या माधमातुन सात दिवसीय निःशुल्क
भव्य योग विज्ञान चिकीत्सा एवम ध्यान शिबीर चे आयोजन
करण्यात आले. ह्या शिबीरास शेकडोंच्या संख्येने उपस्थीत राहण्याचे आवाहन पतंजली योग समितीने केले आहे.
शहरा निकटचे मानव्य विकास विद्यालय,उदगीर रोड,देगलुर ठिकाणी दि.6 मे ते 12 मे 2023 पहाटे 5 ते 7 पर्यंत होणार आहे. तसेच दररोज रात्री 8 ते 9 च्या दरम्यान विवीध विषय ज्यामध्ये पंचकर्म-षटकर्म,ऑरिक्युलम,आयुर्वेदिक घरेलू उपचार, शुद्धीकरण क्रिया, रोग अनुरूप योग उपचार, मुद्रा, ॲक्युप्रेशर, शंका निरसन ( प्रश्नोत्तर चर्चा ) आदीचा समावेश असेल.
सकाळच्या शिबिरात भा.स्वा.ट्र.जिल्हाध्यक्ष रामजी शिवपनोर,पतंजली योग समिती जिल्हाध्यक्ष सुरेश लंगडापुरे हे मुख्य प्रशिक्षक 8 प्रकारचे प्राणायाम, 42 प्रकारची आसन क्रियेत कपालभाती, प्राणायाम, सूक्ष्म व्यायाम, योगिक जॉगिंग, सूर्यनमस्कार, दंड आसने-बैठक,मेडीटेशन ध्यान आदी व इतर विषयांवर पूर्ण प्रशिक्षण व मार्गदर्शन करणार आहेत.तसेच रक्तदाब,मधुमेह, लठ्ठपणा सांधेदुखी, हृदयविकार,पॅरालेसीस व इतर आधी व्याधी वरती मार्गदर्शन राहणार आहे. सोबतच वरिष्ठ प्रांत प्रभारी दतात्रय काळे ,प्रांत कार्यकारीणी सदस्य पंढरीनाथ कंठेवाड,नागनाथ पा.माचनुरकर,अशोकराव पवार,हनुमंत ढगे,महारूद्र माळगे,तुळशीराम केरले गुरूजी,विठ्ठल कोळनुरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.पतंजली योगपीठ,हरिव्दार हुन प्रशिक्षीत डॉ.वर्षाताई केंद्रे,डॉ.मानसी संतान यांच्या कडुन दररोज शिबीरानंतर रिकाम्यापोटी नाडी परिक्षण करण्यात येणार व औषधी उपचार पण केले जातात.
तरी योग शिबिरात जास्तीत जास्त देगलुर करांनी भाग घ्यावा त्याठी नावनोंदणी साठी संपर्क
मारोती पा.मुंके 9975433323
दिगंबर कौरवार 9403262626
मनोजकुमार दोंतुलवार 9689974455
गंगाधर दाऊलवार 9423437342
प्रशांत दासरवार 9420073552
योगेश मैलागिरे 8856969624
धनाजी जोशी 8482878721
अशोक घाटे
98-903-52828 यांच्याकडे मोफत/ निःशुल्क नावे नोंदवावीत. असे सांगण्यात आले आहे.