दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.4 शिरूर तालुक्यामध्ये योगीराज उद्योग समूहाचे चेअरमन राहुल दादा करपे पाटील यांनी एक केला अनोखा उपक्रम चालू, प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येक व्यक्तीच्या जन्मदिनी त्यांचा वाढदिवस मराठमोळा फेटा बांधून एक घड्याळ भेट देऊन शुभेच्छा सदिच्छा आरोग्यदायी मंगलमय कामना देऊन त्या कुटुंबाला प्रेरणा देण्याची योजना त्यांनी केली आहे. अशाच प्रकारे आलेगाव पागा या ठिकाणी त्यांनी माजी सरपंच सतीश राव आरवडे व अण्णा पाटील रासकर यांचे वाढदिवसाच्या दिवशी जाऊन त्यांचाही सन्मान करत असताना आलेगाव पागांमधील महाराष्ट्र पोलीस म्हणून त्यांची रायगड मध्ये निखिल कोळपे तर पुणे ग्रामीणमध्ये संजय भोसले यांची नियुक्ती झाली त्यांचाही सन्मान त्यांनी या पोलीस भरती दरम्यान केलेले कष्ट अभ्यास या गोष्टींचे आव्हान तरुणांपुढे करून कष्ट केल्यामुळे माणसं यशस्वी होतात हे तरुणांच्या लक्षात आणून देऊन कार्यक्रम संपन्न केला. त्या ठिकाणी आलेगाव पागानेदेखील या सर्व उपक्रमाचे राहुलदादा करपे यांना श्रेय देत त्यांचे देखील स्वागत करताना आलेगाव पागाचे तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राव आरवडे यांनी करपे पाटलांना मानाचा फेटा बांधून भारतीय संविधानाची एक प्रत भेट दिली. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य सेकंडरी बँक चे संचालक तुकाराम बेनके, सर माजी पोलीस पाटील ज्ञानेश्वर भाऊ वेताळ, जॉईंट फार्मिंग सोसायटीचे डायरेक्टर केशव लवांडे, दहिवडी गावचे सरपंच राजेंद्र जाधव पाटील, अविनाश जांभळकर, योगीराज मोरे, वैभव राव शिंदे, कालिदास हरिहर, रणजीत कांबळे, आदर्श शिक्षक दिवटे गुरुजी, विठ्ठलराव ढोले त्याचप्रमाणे राहुल दादा करपे मित्रपरिवार व सतीश राव आरवडे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.