दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा.दवणे.
मंठा मे महिन्यातील उन्हाळ्यात सामान्यतः कडक उष्णता असते तापमान जास्त असल्यास आकाशात ढगांची गर्दी झाल्याने गर्मी होतो; परंतु वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यात मान्सूनसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंगळवारी वारी 1मे रोजी तालुक्यातील ग्रामीण भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आला. जवळपास.आठवड्यापासून दररोज दिवसा किंवा रात्री पाऊस बरसत असल्याने उन्हाळ्यातील हा मे महिना नसून पावसाळ्यातील श्रावण महिना ‘
सुरू असल्याचा तालुक्यातील लोकांना भासत
असताना तालुक्यात
एकीकडे तप्त उन्हाच्या झळा बसत असताना जवळपास आठवडाभरापासून दररोज वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावल आहे. या स्थितीत उन्हाळ्यात
पावसाचा फील यायला लागला आहे. मंगळवारी रात्री पुन्हा पावसाने ढगांचा गडगडाटात हजेरी लावली. आठवडाभरापासून तालुक्यात वादळी वारे आणि पाऊस..होतो आहे. यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडू लागली आहे. एकीकडे वाढते तप्त ऊन व दुसरीकडे पडणारा पाऊस यामुळे वातावरणात बदल होऊन नागरिकांत आजाराचे प्रमाण वाढले आहे..
🎆 [लग्न समारंभातही खोडा ]
तालुक्यातील अनेक गावात दिवसा किंवा रात्री पाऊस बरसत आहे. पावसामुळे तालुक्यातील रब्बी पिकावर परिणाम झाला आहे. तसेच सध्या ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम असल्याने आयोजित करण्यात आलेल्या लग्न समारंभांमध्येही पावसामुळे व्यत्यय येत आहेत. शिवाय वादळामुळे तालुक्यातील अनेक विद्युत खांब पडले. तसेच शेतकऱ्यांचे शेतातील रब्बी हंगामातील शेतपिकासह भाजीपाला कांदापिकाचे नुकसान झाले.