दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर:देगलूर तालुक्याला एक ऐतिहासिक वारसा लाभला आहे. आज मुख्यअधिकारी वर्षा ठाकूर यांच्या शासकीय दौऱ्याच्या दरम्यान देगलूर तालुक्यातील येरगी गावाला भेट दिली असता तेथील शिलालेख चालुक्य काळातील जुने मंदिर त्याचप्रमाणे वाडे, दगडी वाडे, बारव सगळे बघून स्तंभित व्हायला झाले. जिल्हा परिषद शाळेतील परसबाग, हर घर नर्सरी, शाळेतील फुलवलेली फुलबाग व रोपवाटिका यामुळे शाळेचे वातावरण प्रसन्न झाले आहे.असे मुख्य अधिकारी वर्षा ठाकूर यांनी म्हणाले तसेच गावात सार्वजनिक ठिकाणी cctv बसविण्यात आले आहेत. गावातील रस्ते, पाणी व्यवस्थापन उत्तम आढळून आले. त्यावेळी येरगी ग्रामपंचायत चे सरपंच संतोष पाटील यांचे वर्षा ठाकूर यांनी स्तुती करून त्यांच्या कार्याचा गौरव केला त्यावेळी देगलूर चे गट विकास अधिकारी .शेखर देशमुख, येरगी गावच्या सरपंच संगीता पाटील, ग्रामसेवक तोटवाड मुख्याध्यापक .देवकते व गावातील प्रतिष्ठ नागरिक व सर्व गावकरी उपस्थित होते