दैनिक चालू वार्ता परतूर प्रतिनिधी-
परतूर : गोळेगाव ता परतूर येथे जीर्ण झालेल्या विज वाहक तारा रस्त्यावर तुटून पडल्याने शॉक लागून दोन शेळ्या दगवल्याची घटना नुकतीच घडली यात शेळी पालन करणाऱ्या शेतकऱ्याला साधारण शॉक लागला असून सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.
याविषयी अधिक माहिती अशी की,दि.४ मे रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास शेतकरी बाळू सर्जेराव कांडूरे हे आपल्या बकऱ्या घरा पासून गावाबाहेर असलेल्या गोठ्यावर घेऊन जात असताना रस्त्यावर पडलेल्या विज वाहक तारेला चिकटल्याने एक बोकड आणि एका शेळीला शॉक लागला असता शेळी का पडली हे पाहण्यास गेलेल्या शेळ्या मालकास विजेचा साधारण शॉक लागला मात्र यात दोन शेळ्या जागीच मृत्यू पावल्या असून कायम वर्दळी असलेल्या रस्त्यावर तुटून पडलेल्या तारेमुळे मोठा अनर्थ टळला आहे,वीज वितरण कंपनीच्या धोरणामुळे सदरील घटना घडली असून यात शेतकऱ्यांची चाळीस ते पंचे चाळीस हजार रुपयांची आर्थिक हानी झाली आहे,१९७८ ते ८० च्या दरम्यान गावात महावितरण कडून विज जोडण्यात आली होती तेंव्हा पासून पोलवरील तारा आणि पोल बदलण्यात आलेले नसल्याने संपूर्ण पोल आणि तारा अतिशय जीर्ण झाल्या असल्याने सदरील घटना घडली आहे, गोळेगाव येथे तारा तुटण्याच्या घटना वारंवार घडत आहेत याकडे विज वितरण कंपनी ने लक्ष द्यावे अशी मागणी गावकऱ्यांकडून केली जात आहे. झालेल्या घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आल्याने विज वितरण कंपनीचे कर्मचारी पांडुरंग आगलावे व पशु वैद्यकीय विभागाचे प्रशांत डाके व एस आर खरात यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून संबंधित विभागाला सादर केला आहे.