दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
जालना मंठा तालुक्यातील गावखेड्यातील मोकाट कुत्र्यांना खरूज रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाली असून ते सैरावैरा गावभर भटकत फिरत असतात ओट्यावर बसतात लगेच नागरिक लहान मुलं त्याच ओट्यावर बसतात या कारणाने खरूज संसर्ग पोहोचण्याची भीती निर्माण झाली आहे. वेळीच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मोकाट कुत्र्यांवर औषधी उपचार करण्याची नागरिकांनी मागणी केली आहे.
त्यांना दारावर आले की खाद्य टाकणाऱ्या नागरिकांपर्यंत हवेच्या माध्यमातून मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव परिसरात फिरणाऱ्या मोकाट कुत्र्यांना खरूज रोगाची लागण मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. या खरूज रोगामुळे कुत्री दिवसभर सैरावैरा भटकत असूनकाहीचा मृत्यूही होत आहे .खरूज झालेल्या कुत्र्यावर घरमालक दुर्लक्ष करीत आहेत कुत्री कोणाच्या मालकीची असली, तरीही मुक्याप्राण्याच्या दयेपोटी दारावर आले की नागरिक उरलेली भाजी भाकरी खाऊ घालत असतात गेल्या काही महिन्यापासून कुत्र्यांना खरुज या रोगाची लागण झालेली आहे. त्यामुळे कुत्र्यांच्या जीवावर उठलेल्या या रोगाची बाधा नागरिकांनाही होत असून खाज सुटलेल्या रुग्णांची संख्यात वाढ होत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन लागण झालेल्या कुत्र्यांवर वेळीच उप करुन उपाययोजना राबवण्याची मागणी होत आहे.