दैनिक चालु वार्ता उपसंपादक जिल्हा उस्मानाबाद -नवनाथ यादव
भू म/उस्मानाबाद:- भू म तालुक्यातील आंबी पोलीस ठाण्याचे एपीआय विक्रांत दिलीप हिंगे यांच्या वाढदिवसानिमित्त आपुलकी बहुउद्देशीय सामाजिक संस्था पाथरूड संचलित आपुलकी वस्तीगृहात अनाथ, गरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी एपीआय हिंगे यांनी पाच हजार रुपये किंमतीचा किराणामाल व शालेय साहित्य दिले.त्याप्रसंगी पद्माकर आहेर, नागेश लोमटे, सिद्धेश्वर शिंदे ,राम कुंभार, बळीराम सोनटक्के ,अशोक पवने सुनिता पवार ,शेबीया शेख इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी सर्वांचे आभार राजेंद्र दरंदले यांनी व्यक्त केले.