दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक- दीपक कटकोजवार
चंद्रपूर महानगरातील राष्ट्रवादी तुलसी नगरात असलेल्या धम्मकिर्ती बुध्द विहाराच्या आवारात टिन शेड तयार करून देण्याबाबत प्रभागाचे माजी नगरसेवक सुभाषभाऊ कासनगोट्टूवार यांनी दिलेले शब्दरुपी आश्वासन बुध्द पौर्णिमा दिनी जेष्ठ उपासकांच्या शुभहस्ते नारळ फोडुन भुमीपुजन कार्यक्रम पार पाडत त्यांनी दिलेला शब्द पुर्ण केला. तत्पूर्वी बुद्ध वंदना घेण्यात आली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि मनपातील जेष्ठ माजी नगरसेवक कासनगोट्टुवार यांनी अलीकडेच काही दिवसांपूर्वी या विहारात टिन शेड निर्माण करुन दिल्या जाईल असा शब्द दिला होता.तसेही ते कोणत्याही विकास कामांबाबत जे आश्वासन देतात ते कधीच व्यर्थ जावू देत नाही हे प्रभागातील नागरिक चांगलेच जाणुन आहे. त्याच अनुषंगाने राष्ट्रवादी तुलसी नगरातील धम्मकिर्ती बुध्द विहाराच्या पदाधिकाऱ्यांना दिलेला शब्द पुर्ण करीत आज बुध्द पोर्णिमेच्या शुभदिनी टिन शेड चे भुमिपुजन करवून घेण्यासाठी त्यांनी स्वतः पुढाकार घेतला व काम सुरू केले.
याप्रसंगी धम्मकिर्ती बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष राकेश रामटेके, उद्धव ठेमस्कर,आनंद वनकर, राहुल निमगडे,निरंजने गुरुजी,अनिल देशपांडे,राहुल पेटकर,जितेंद्र वाकडे, हिम्मत मडके,विवेक कांबळे,लिला रामटेके,शोभा मडके यांचेसह परिसरातील उपासक व उपासिका आदिंची प्रामुख्याने उपस्थिती होती.