दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- भाजपाच्या प्रदेश पदाधिकारी निवडीवर वसंत राव महामंडळाचे माजी उपअध्यक्ष देविदास राठोड यांना संधी देण्यात आली असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आदेशानुसार देविदास राठोड यांचे भाजपा महाराष्ट्र सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे भाजप कार्यकर्त्यात प्रचंड जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच जिल्ह्यातील व महाराष्ट्रभरातील कार्यकर्ते उत्साहाचा आनंद साजरा करत आहेत. महाराष्ट्र राज्यभर देविदास राठोड यांचे प्रभावी वजनदार व्यक्तिमत्व म्हणून ओळख आहे. त्यांची गेली वीस वर्षे पक्षाशी एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून काम केले. सामाजिक चळवळींमध्ये तसेच राजकीय व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्र नव्हे तर महाराष्ट्र बाहेर ओळखले जात असलेल्या देविदास राठोड यांना भाजपाने राज्य प्रदेश सचिव पदावर घेऊन मानाचे स्थान दिले आहे. बंजारा बहुल भागातील लोकसभा व विधानसभेच्या विविध मतदारसंघात यांचा करिष्मा आहे.त्या मतदारसंघात यांचा दांडगा जणसंपर्क आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि प्रदेशाचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या बरोबर लोकनेत्या पंकजा मुंडे यांचे ते निष्ठावान जवळचे आणि विश्वास म्हणून ओळखले जातात. यामुळे प्रदेश पदाधिकारी मध्ये महाराष्ट्र राज्य “सचिव” म्हणून त्यांची निवड करण्यात आली.