दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी- समर्थ दादाराव लोखंडे
श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पू.)ता.गंगापूर येथे छत्रपती शाहू महाराज यांचा स्मृति साजरा करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे होते तर शाळेतील शिक्षक प्रमुख वक्ते श्री शिवकुमार होनराव शाळेच्या पर्यवेक्षिका श्रीमती सरोज पवार उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री अनिल भांड यांनी केले प्रस्तावनेतच त्यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनावर अनेक प्रसंगाचा उलगडा करून सर्वांना माहिती दिली.शाळेतील शिक्षक शिवकुमार होनराव यांनी छत्रपती शाहू महाराजांच्या बहुजन कार्याविषयी माहिती दिली. सर्वांना मोफत शिक्षण व वसतिगृहाची सुविधा उपलब्ध करुन दिली. छत्रपती शाहू महाराजांनी जनतेला शिक्षणाचे महत्त्व पटवून सांगितले अनेकांना शिक्षणासाठी मदत केली. सामाजिक सुधारणा कशी घडून आणली याची सविस्तर माहिती दिली. शेवटी मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे यांनी छत्रपती शाहू महाराजांनी सामाजिक कार्यात विधवांच्या प्रश्न त्या विषयी केलेल्या कायदा, शेतीचा विषयक प्रश्न, देवदासिंचा चा प्रश्न,जातीभेद वर्ण भेद,या अनेक सामाजिक विषयाविषयी सविस्तर माहिती दिली. छत्रपती शाहू महाराजांनी जनतेच्या कलागुणांना राजाश्रय दिला त्यात संगीत,चित्रकला,नृत्य, लोककला,कुस्ती यावर भरीव कार्य केले या बाबी सांगून अध्यक्षीय समारोप केला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सुरेश सुलताने,भगवान वनारसे,सुरेश घोरबांड,संतोष बंडेवार,विजसिंह परदेशी, रमा आडे,वैशाली सपकाळ, सविता गोसावी,आशा साळुंके,सतीश जावळे, तारामती जाधव,प्राथामिक विभागाचे गणेश गिरी, मनोज सुरणर,मारोती राठोड,सोमचे मॅडम उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला. शेवटी दोन मिनिट स्तब्ध थांबून छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यात आले.