दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.6 आव्हाळवाडी (ता. हवेली) येथील महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव गणेश कुटे यांची राज्य कार्यकारिणीवर निमंत्रित सदस्य पदी निवड केली आहे.
दोन वेळा हवेली तालुक्याचे भाजपचे अध्यक्ष पद तसेच ग्रामपंचायतीचे उपसरपंच पद गणेश कुटे यांनी भूषवले आहे. तालुक्यातील सर्वात मोठा पक्षप्रवेश हा गणेश कुठे तालुका अध्यक्ष असताना झाला होता. भाजपची संघटना मजबूत करून गावोगावी कार्य केल्याने भाजपच्या युवा मोर्चा प्रदेश सचिव पदापर्यंत कुटे यांची वर्णी लागली होती. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील काही निवडक भाजपच्या कार्यकर्त्यांची निमंत्रित सदस्यपदी निवड केली असून यात गणेश कुटे यांचा समावेश झाल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. माजी राज्यमंत्री संजय भेगडे, आमदार राहुल कुल, नेते विक्रांत पाटील, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, रोहिदास उंद्रे, सुदर्शन चौधरी, रवींद्र कंद, संदीप सातव, ग्रामपंचायत सदस्य अविनाश कुटे आदींनी कुटे यांच्या अभिनंदन केले आहे.