दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.6 वाघोली येथील उबाळेनगर परिसरात असलेल्या “शुभ सजावट” या मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. गोडाऊनमधील ४ सिलेंडर फुटल्याने आग मोठ्या प्रमाणावर भडकली. उबाळेनगर मधील शुभ सजावट या मंडपाचे साहित्या असणारे गोडाऊन आहे. या गोडाऊनमध्ये रात्री ११.४५ च्या सुमारास अचानक आग लागली या आगी मध्ये चार गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. यामुळे सर्व गोडाऊनला आग लागली. आगीची माहिती मिळताच पुणे महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या पाच गाड्या आणि पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या ( पीएमआरडीए ) चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. घटनास्थळी दाखल होताच अग्निशमन दलाच्या जवानांच्या अथक प्रयत्नातून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. आग लागलेल्या गोडाऊनच्या शेजारीच ४०० सिलेंडरने भरलेले आणखी एक गोडाऊन होते. मंडपाचे साहित्य असणाऱ्या गोडाऊनची आग शेजारच्या गोडाऊनला भीषण आग, तीन जणांचा होरपळून मृत्यऊ लागली असती तर मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने मोठा धोका टळला. PMRDA व महानगरपालिका मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आगीव नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले.