दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :-जगंत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज जयंती निमित्त कंधार तालुक्यातील बसव भक्तांनी कंधार येथील महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बसवभक्त सतिष देशमुख यांनी केले आहे.
१२ व्या शतकांत सर्व धर्म समभाव अशी शिकवण देणारे क्रांती सुर्य जगंत ज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने दिनांक १५ मे सोमवार रोजी कंधार येथे होणाऱ्या जयंती महोत्सव सोहळयास श्री सोमलिंग शिवाचार्य महाराज बिचकूंदेकर , श्री सिध्ददयाळ शिवाचार्य महाराज बेटमोगरेकर, श्री विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर ,श्री वेदांतचार्य दिगाबंर शिवाचार्य महाराज वसमतकर, श्री गुरु महंत एकनाथ नामदेव महाराज मंठ संस्थान उमरज तसेच आदि गुरुवर्य उपस्थित रहाणार आहेत कंधार तालुक्यातील कौठा,काटकळंबा ,राऊतखेडा, धानोरा ,तेलूर ,शिरुर ,शिरशी, चौकीमहाकाया ,जाकापुर, मंगनाळी ,रुई ,सावरगाव, कळका,बोरी तसेच इतर गावातील बसव भक्तांनी दरवर्षी प्रमाणे होणाऱ्या बसव जयंतीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन बसव भक्त सतिष देशमुख यांनी केले आहे . कंधार येथील महात्मा बसवेश्वर महाराज जयंती साठी कौठा काटकंळबा येथुन बसव भक्तांना गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे तरी परिसरातील बसव भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बसवभक्त सतिष देशमुख यांनी केले आहे