दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
जालना, मंठा लोखंड, रेती, सिमेंट व इतर बांधकाम
साहित्याच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बांधकामाचा खर्च अधिक वाढला असल्याने परिणामी सामान्यांचे आर्थिक नियोजन बिघडले आहे. खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे बहुतांश बांधकामाची गती मंदावली आहे. ज्यांनी करार पद्धतीने घर बांधण्यासाठी दिले आहे. त्यांची कामे करण्यास संबंधित कंत्राटदार टाळाटाळ करीत आहेत.काही घर बांधकाम बंद केलं आहे
राहायला स्वतःच्या हक्काचे घर असावे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यासाठी अनेक वर्षाची मायापुंजी वापरून काटसरीन नियोजन करून घराचे कामे धरले जातात. आता अशी बांधकामे हाती घेतलेले लोकांचे महागाईमूळे नियोजन कोलमडले आहे. परिसरातबरीचशी बांधकामे सुरू आहेत. त्यात वैयक्तिक बांधकामाची संख्या अधिक आहे.
यातील बहुतांश बांधकामे ही कोरोना काळाच्या आधी सुरू झालेली आहेत, मात्र आता बांधकाम साहित्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे.रेती,सिमेंटचे भाव वाढले, लोखंडाचे भाव वाढले आहे. त्यासोबतच स्थानिक पातळीवरील उपलब्ध होत नसल्याने बांधकामासाठी चढ्या दराने रेती खरेदी करावी लागते. त्यासाठी जास्तीचे पैसे मोजावे लागत आहेत. परिणामी, बांधकामाचा खर्च वाढला आहे. वाढता खर्च आवाक्याबाहेर गेल्यामुळे बरीच बांधकामे संथगतीने सुरू आहेत. बांधकाम साहित्यांच्या किंमतीत वाढ झाल्याने व सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार की नाही. यामुळे अनेक सर्वसामान्य नागरिक
चिंतातूर आहेत.