दैनिक चालु वार्ता ग्रामीण प्रतिनिधी- माणिक सुर्यवंशी.
जि. प. के प्रा. शाळा आलूर ता. देगलूर येथे राजश्री शाहू महाराज स्मृतिदिन शताब्दी सांगता निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या दिवशी राजश्री शाहू महाराज स्मृतिदिन निमित्ताने त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून शाहू महाराजांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी माहिती सांगण्यात आली. या दिवसाचे अवचित्ये साधून शासनाच्या परिपत्रकानुसार शाळेतील विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ घेऊन विद्यार्थ्यांचा वार्षिक निकाल घोषित करुन गुणपत्रक देण्यात आले.
त्याचबरोबर या शाळेतील विद्यार्थीप्रिय, तंत्रस्नेही, शिक्षक श्री व्ही. एम. वाडेकर सर यांना महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ व छत्रपती शिवाजी राजे प्रतिष्ठान नांदेड यांच्यातर्फे जिल्हास्तरीय शिक्षक आयकॉन पुरस्कार मिळाल्याबद्दल शाळेतील सहकारी शिक्षक, विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर आज 6 मे रोजी शाळेतील शिक्षक श्री वाडेकर सरांचा जन्मदिवस असल्यामूळे शाळेमध्ये वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. अशा या दुग्ध – शर्करा योगप्रसंगी गावातील समाजसेवक तथा भारतीय मराठा महासंघाचे जिल्हा सचिव श्री अमृत पाटील, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री नागनाथ कुर्लेपवार, उपाध्यक्ष श्री नारायण बारलवार, शाळेचे मुख्याध्यापक श्री मठपती सर, श्री करेवाड सर, श्री चामावार सर, श्री अजगरे सर, श्री कडलवार सर, गावातील अमोल बच्चेवार, संजय पोकर्णे कृष्णा पाटील इ. याप्रसंगी उपस्थित होते.