दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
लोहा शहरात येणाऱ्या काळात मार्केट कमिटीची निवडणूक आहे सदर निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक स्वबळावर लढवण्याची मागणी शहराध्यक्ष व मा. उपनगराध्यक्ष व्यंकटेश (उर्फ) सोनू संगेवार यांनी पक्षसृष्टीकडे निवेदनाद्वारे केली आहे.
पूर्वी अनेक वेळा काँग्रेस पक्षाने महाविकास आघाडीत अनेक निवडणुका लढवल्या पण त्यातून बरेच वाईट अनुभव पाहायला मिळाले यामुळे यावेळी होणारी मार्केट कमिटीची निवडणुक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी स्वबळावर लढवण्याचे ठरवले आहे. मार्केट कमिटीची निवडणुकी लोहा तालुका अध्यक्ष शरद पाटील पवार, एकनाथ मोरे, रंगनाथ भुजबळ, श्रीनिवास मोरे, डॉ. कालिदास मोरे, गणेशराव घोरबांड, भास्करराव पाटील जोमेगावकर, बाजीराव भालेराव, किशनराव लोंढे, संभाजीराव धुळगुंडे, वसंतराव पाटील पवार, उत्तम वडवळे, निरंजन कौडगावकर, नितीन पाटील झरीकर, बाबासाहेब बाबर, सतीश ढाकणीकर, बाळू पाटील गवते, बंडू पाटील पवार, माधव पाटील आन्नकाडे, माणिक पाटील वाकडे, माणिकराव देवकते, भाऊराव कंधारे, शिवाजीराव आंबेकर, उत्तमराव महाबळे, पंचशील कांबळे, पंकजसिंग परिहार, शरफौद्दीन शेख, अकबर मौलाना, डी. एन. कांबळे यांच्या नेतृत्वाखाली नियोजनबद्ध पद्धतीने लढवण्यासाठी काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तयारी केली आहे. ही निवडणूक स्वबळावर लढवण्यासंदर्भात लवकरच मा. आमदार मोहनराव हंबर्डे, माजी आमदार अमरभाऊ राजुरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात येणार आहे अशी माहिती शहराध्यक्ष व्यंकटेश उर्फ सोनू संगेवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. तरी सर्व कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मार्केट कमिटीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कामाला लागावे असे आवाहन शहराध्यक्ष व्यंकटेश (उर्फ) सोनु संगेवार यांनी केले आहे.