दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी – स्वरूप गिरमकर
वाघोली ता.6 शिक्रापूर नगरीचे श्री / सौ . मंगलताई सतिष सासवडे हे दापंत्य नेहमीच लोकोपयोगी उपक्रम राबवत असतात . विशेष करून महिलान साठी जास्त उपयुक्त ठरेल असे कार्यक्रम घेतात . श्री . सतिष सासवडे यांचे वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते मुलांना खाऊ वाटप केला होता . विशेष काल०५/०५/२०२३ रोजी सौ . मंगलताई सतिष सासवडे (यशकिर्ती सामाजिक संस्था शिक्रापूर अध्यक्षा आणि भूमाता ब्रिगेड शिरूर तालुका अध्यक्षा ) व सौ . रमाताई आशोक आठवले (यशकिर्ती सा . सं . सदस्या ) संयुक्त पणे वाढदिवस साजरा करणेत आला त्या निमित्ताने महिलांना सॅनिटरी नॅपकीन विघटन कसे करायचे आणि अल्काईन वॉटर कसे फायद्याचे या विषयी श्री संदानंद उमाळे आणि सौ . सारिका पाठक यांचे मार्गदर्शन घडवून आणले . तसेच माहेर संस्था वढू येथील मुलांना जेवण व मुलींना कपड्यांचे वाटप करणेत आले . यावेळी शुभेच्छा आणि सदिच्छा देताना सौ . तृप्तीताई देसाई ( अध्यक्षा भूमाता बिग्रेड ) यांनी डॉ . सौ मंगलताई सासवडे यांची यशोगाथा उपस्थितीत महिलांना सांगितली . यावेळी पतंजली योग साधना शिरूर अध्यक्ष श्री . अंकुश घारे सर्जरी फाउन्डेशन च्या ईला शेख शिक्रापूर ग्रा.पं. सदस्या शालन राऊत आम आदमीच्या सौ सिमाताई गुट्टे वैशाली बांगर आणि महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थितीत होता . सुत्रसंचालन सुरेखा इंगळे तर आभार श्री . भाऊसाहेब कोकडे उरळगाव आणि सतिष सासवडे यांनी मानले . सदर कार्यक्रमाचे आयोजन यशकिर्ती सामाजिक संस्था सर्व पदाधिकारी यांनी केले होते .