दैनिक चालु वार्ता नांदेड प्रतिनिधी- प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
. महाराष्ट्राची आंबेडकरी चळवळीतील बुलंद तोफ ख्यातनाम कवी व गायक प्रमोदजी लोखंडे नागठाणकर यांचे अकस्मित निधन झाले त्यांनी तमाम महाराष्ट्रातील ग्रामीण भागात आंबेडकरी चळवळ अतिशय तळमळीने राबवली असून व समाज प्रबोधनाच्या माध्यमातून समाज जागृती व समाज उन्नती करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे ते उत्तम गायक व कवी सुद्धा होते त्यांचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवन चरित्रावर अनेक लोकप्रिय गीते संगीत क्षेत्रात गाजलेली आहेत त्यापैकीच एक माझ्या भिमाच्या पुण्याईने बसायाला लाल दिव्याची गाडी ही अतिशय लोकप्रिय गीत त्यांनी स्वतः गायलेले आहे अशा अनेक गीताच्या माध्यमातून समाजप्रबोधनाचे कार्य समस्त महाराष्ट्रभर शहरी भागासह महाराष्ट्रात केले आहे . प्रमोद जी लोखंडे यांच्या अकाली निधनामुळे आंबेडकरी चळवळीला सुरू लागले असून समस्त बहुजनामध्ये त्यांच्या निधनाची वार्ता ऐकताच संपूर्ण महाराष्ट्रावर अशोक कळा पसरली आहे त्यांच्या या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना तमाम जनता करीत आहे