दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड :-
शहरातील महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालयाच्या ” करियर कट्टा ” विभागाच्या वतीने” राज्यसेवा आणि कंबाईन” -2023 च्या परीक्षार्थ्यानां आँनलाईन मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती . स्पर्धेच्या युगात संकटाला सामोरे जात असताना मनातील भिती दूर करून शर्यतीच्या शेवटपर्यंत तग धरून मेहनत सतत करत राहिल्याने मिळणारे यश हे फक्त तुमच्यासाठीच असते असे महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉ.शिवानंद अडकिणे यांनी प्रतिपादन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. शिवानंद अडकिणे सर तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून विक्रीकर अधिकारी श्री.भावना होनशेट्टे , पोलिस उपअधीक्षक श्री नाथा गार्ग सी.आय.डी.विभाग औरंगाबाद प्रमुख , महाराष्ट्र राज्य हे मार्गदर्शन सेमिनार आँनलाईन आयोजित केले गेले होतें .या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा.डॉ. संतोष शेंबाळे तर आभार प्रदर्शन प्रा.डॉ. शिवसर्जन टाले यांनी केले .
या आँनलाईन घेण्यात आलेल्या कार्यशाळेच्या माध्यमातून नुकतेच 12 , पदवी , पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून स्पर्धेच्या युगात वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्पर्धा परीक्षा देण्यासाठी प्रयत्नशील असतात . 30 एप्रिल रोजी होणाऱ्या एमपीएससी परीक्षेसाठी देखील ही कार्यशाळा एक प्रेरणादायी ठरलेली आहे.यशवंताचे विविध अनुभव यावेळी व्यक्त केले . आँनलाईन कार्यक्रमात विद्यार्थी , पालक , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते ….