दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघ संघातील व आर्णी तालुक्यातील नदी काठावर वसलेले खेडे गांव आयता येथे गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ-आयता या एस.टी बस ची रात्री मुक्कामी सेवा अविरतपणे सुरू होती मात्र अचानक कोणतेच कारण नसतांना ही एसटी आयता येथे मुक्काम न राहता कापेश्वर देवस्थान येथे मुक्कामाला जात आहे. एसटी सेवा आयता येथून बंद झाल्या मुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना व आयता येथील नागरिकांना प्रवासासाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे… खाजगी वाहनाने प्रवास करताना प्रवाशांना जादा भाडे स्वरुपात भुर्दंड बसत आहे. अति महत्वाच्या कामास जायचे असेल तर काही किलोमीटरच्या प्रवासासाठी संपूर्ण दिवस लागत असल्याचे अनेक प्रवाशी नागरीकांनी सांगितले.
लग्न, अंत्यविधी, तेरवी, दवाखाने, बाजारपेठ तसेच शासकीय कामांसाठी पटवारी, ग्रामसेवक व नायब तहसीलदार कार्यालय होणारा प्रवास व जिल्ह्याच्या ठिकाणचा प्रवाससाठी आयता येथुन असलेली एसटी बस सेवा बंद झाल्यामुळे प्रवाशी नागरिक व शालेय विद्यार्थ्यांची फारच गैरसोय होत आहे. बंद झालेली एसटी बस सेवा कधी सुरू होते या प्रतिक्षेत आयता वासीय नागरिक व विद्यार्थी वर्ग आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा ही ग्रामीण भागाची जीवनदायी ठरली मात्र ती आयता गावातून ठप्प झाल्याने ३ में २०२३ पासून प्रवाशांचे होणारे हाल व मनस्ताप लक्षात घेऊन यवतमाळ आगाराने यवतमाळ ते आयता मुक्कामी एसटी बस सेवा पुर्ववत त्वरित सुरू
करावी अन्यथा आगाराच्या विरोधात गांवक-यांना सोबत घेऊन निषेध आंदोलन करावे लागेल असा गर्भित इशारा आयता येथील रहिवासी पत्रकार अभिजीत मडावी यांनी दिला आहे.