दैनिक चालु वार्ता अहमदपूर तालुका प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित.
==========================
(अहमदपुर येथील महात्मा फुले विद्यालयातील प्रकार.)
==========================
लातुर/अहमदपुर: अहमदपुर शहर शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखले जाते पण येथील काही खाजगी शाळा,संस्थानी याला व्यापाराच केंद्र बनवलं आहे.अहमदपुर शहरातील महात्मा फुले विद्यालयात उन्हाळी क्लास च्या नावावर नववी उत्तीर्ण आणी दहावी वर्गात जाणाऱ्य विध्यर्थ्यांना प्रत्यक्ती तीन हजार(3000)रुपये फी म्हणून घेतली जाते.हा नेमका काय प्रकार आहे?सुट्या मध्ये तुम्ही शिकवता त्याचे पैसे घेताय तर मग शाळेच्या वर्गाचा का वापर करता?तुम्ही खाजगी खोली घेऊन शिकवा नाहीतर मग शाळेत क्लास घेत असाल तर तुम्हाला विध्यर्थ्यांना पैसे मागण्याचा अधिकार आहे का?अशी पालकांची भावना आहे.
महात्मा फुले शाळेत शिक्षण घेणारी मूल ही बहुतांश शेतकरी,मंजूर यांचीच आहेत एक महिन्यासाठी 3000फिस शेतकऱ्यांना परवडणार आहे का?शाळा व्यवस्थापन याच्यावर कारवाई करेल का?काही पत्रकारांनी संबंधित कार्यरत काबरा सर मुख्याध्यापक यांना या संदर्भात विचारणा केली असता ते अरेरावीची भाषा वापरत आहेत.असा शिक्षणाचा व्यापार ,बाजार रोखला नाहीतर सामान्य लोकांना शिक्षणा पासून वंचित राहावं लागेल.