दैनिक चालु वार्ता अंबड प्रतिनिधी-ज्ञानेश्वर साळुंके
अंबड ते जालना रोडवरील पारनेर शिवारातील घटना रिलायन्स पेट्रोल पंपा समोर अपघात घडला असून गाडी मोटार सायकल क्रमांक MH21AA5323. तर चार चाकी वाहन क्रमांक MH21BH2474
या गाडी ला अशोक लेलँड व मोटर सायकल चा झालेल्या धडकेत चालक जागीच ठार तर 12 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे अपघातात झालेल्या ही इसम चे नाव गोरख बाबुराव राठोड वय 33 राहणार गोविंदपुर तांडा तालुका अंबड तर मुलगा रोहित किसन राठोड वय १२ राहणार गोविंदपुर तांडा ता अंबड हा अपघात दुपारी 4:30 च्या सुमारात घडला आहे घटनाची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रेयश हुंबे पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण प्रताप चव्हाण राम मते घटनास्थळी जाऊन जखमींना तात्काळ अंबड येथील उप रुग्णालयात दाखल करण्यात आले व उपचाराच्या वेळेस गोरख राठोड यांना वैद्यकीय अधिकारी मंगल पवार यांनी मयत घोषित केलं दोन्ही वाहने अंबड पोलीस स्टेशनला जमा केले हे अपघातातील दोघेजण अंबड येथे सिमेंटची बॅग आणण्यासाठी चालले होते व अशोक लेलँड ही गाडी अंबड कडून गुरुकृपा गॅस एजन्सी मध्ये वळत होते या दोन्ही वाहनांच्या झालेल्या अपघातात एक ठार तर दुसरा गंभीर जखमी जालना येथील रोहित राठोड या मुलाला जालना येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे