दैनिक चालु वार्ता उपसंपादक आष्टी-अवधूत शेंद्रे
आष्टी(श)(वर्धा): नजीकच्या येणाडा येथील धम्मप्रकाश विपश्यना केंद्र तथा डॉ बाबासाहेब आंबेडकर थॉट्स आणि रिसर्च सेंटर येथे त्रिपावन वैशाख बुध्द पौर्णिमा समारोह साजरा झाला त्यात पाहटे ४ वाजता पासून विविध कार्यक्रमाचे आयोजन होते त्यात जागरण,ध्यान साधना,बुध्द,धम्म,संघ वंदना, धम्मध्वज वंदना ( पूज्य भिक्खू संघ) बुद्ध वंदना, पूजा परित्राण पाठ, धम्मदेशना,पूज्य भिक्खू संघाचे जेवण,सार्वजनिक भोजनदान, विद्यार्थ्यांची भाषणे, भगवान बुद्ध डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर उपस्थित मान्यवरांची भाषणे, प्रश्नमंजुषा कार्यक्रम व सायंकाळी जळगाव(बेलोरा) येथील आंबेडकरी गायक राजेश पावडे व संघ यांचा कार्यक्रम घेण्यात आला तर मुख्य कार्यक्रमात अध्यक्ष आणि प्रमुख मार्गदर्शक भदंत सत्यानंद महास्थविर,भदंत आर्य सारीपुत्र स्थविर,भदंत मिलिंद, भंते सुयोग, भंते रत्नकीर्ती, भंते रक्खित धम्मो,महादानशूर उपासक सिद्धार्थ शेंद्रे,सुजाताताई प्रा.डॉ. विजयाताई मुडे(आर्वी) सामाजिक कार्यकर्त्या प्रतीक्षा दापुरकर(आष्टी)प्रा.बी. टी.उरकुडे,सहा.पो.निरीक्षक आशिष गजभिये [तळेगाव (श्या. पं) पोलीस स्टेशन] पो.उप.निरीक्षक मंगेश डांगे(बाभूळगाव पो.स्टे.) जि.यवतमाळ प्रा.सुरेंद्र अवथरे, डॉ.प्रा.प्रशांत धनविज,डॉ. प्रा.कपिल पाटील,उद्दोजक बाबाराव सोमकुंवर,कृउबा समिती संचालक वनिताताई सोमकुंवर,माजी.पं.स.सदस्य देवानंद डोळस,संपादक राहुल गजरे,सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कठाणे,प्रा.अनिल भगत, प्रा. संध्याताई भगत,भाऊराव दंडाळे,रवींद्र नागले,सिद्धार्थ मुंद्रे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी विद्यार्थिनी कु. विधी लांडगे,कु.वंशिका आडे यांनी प्रखर भाषणे केली तर मंचावरील मान्यवरांनी प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.बी.टी.उरकुडे कार्यक्रमाचे संचालन भारती तायडे यांनी तर आभार प्रदर्शन भदंत महास्थविर सत्यानंद महाथेरो यांनी केले