दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी नगरपालिकेने एक जेसीबी, चार टिप्पर आणि दोन डम्परची खरेदी केली आहे. ही वाहने लवकरच पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत परंतु नगरपालिका प्रशासनाकडून अद्याप पावसाळापूर्व नालेसफाईची कामे सुरू झालेली नाहीत. ही वाहने आल्यानंतर स्वच्छतेची कामे करण्याचे पालिकेचे नियोजन असून, वाहने वेळेत आली नाहीत तर ३१ मेपर्यंत पावसाळापूर्व कामे होणार का? असा प्रश्न निर्माण होत आहे.
नगरपालिकेमार्फत शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या घनकचरा प्रकल्पाचे काम अंतिम टप्यात आले आहे. या प्रकल्पासाठी व शहर स्वच्छतेसाठी वाहनांची आवश्यकता आहे. यासाठी पालिका प्रशासनाच्या तीने घनकचरा प्रकल्पाच्या निधीतून एक जेसीबी, चार टिप्पर अन् दोन डम्परची खरेदी केली आहे. यातील चार टिप्पर प्रत्येकी तीन टनांचे तर दोन डम्पर हेही प्रत्येकी तीन टनांचे आहेत. तर जेसीबी ७४ एचपीचा आहे. वाहने खरेदीची प्रक्रिया पूर्णत्वास आली असून, लवकरच ही वाहने शहर स्वच्छतेसाठी पालिकेच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. ही वाहने आल्यानंतर पावसाळापूर्व नाले स्वच्छतेची कामे करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
–संतोष खांडेकर, मुख्याधिकारी
शहर होणार धूळमुक्त !
जवळपास तीन कोटींची बचत
शहरातील स्वच्छतेच्या कामासाठी
जवळपास सात ते साडेसात कोटी रुपये वार्षिक खर्च नगरपालिका प्रशासनाला करावा लागत होता.
) या वाहनामुळे हा खर्च निम्म्यावर येणार •असून, केवळ वाहनचालकांच्या वेतनावरील राहणार आहे. यामुळे जवळपास तीन कोटी रुपयांची वार्षिक बचत होणार असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.
असे आहे म्हणणे…
घनकचरा प्रकल्पासह शहर स्वच्छतेसाठी नव्याने वाहने खरेदी केली आहेत ती वाहने लवकरच प्राप्त होणार असून, पावसाळापूर्व कामेही वेळेत करण्याचे नियोजन आहे. ही वाहने प्राप्त होताच तातडीने कामे सुरू केली जातील. त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध आहे.
नगरपालिकेची वाहने स्वच्छतेच्या कामासाठी येणार असतील तर ती चांगली बाब आहे. पावसाळ्यात अनेक भागात पावसाचे पाणी तुंबते. अनेक भागांतील घरामध्येही पाणी जाते. ही स्थिती आगामी पावसाळ्यात उदभवू नये, यासाठी नगरपालिकेने पावसाळापूर्व कामे वेळेत करणे गरजेचे आहे.
संध्या देठे, माजी नगरसेविका
जालना शहरातील म्हसोबा मंदिर ग्रीन सिटी पार्क मागील नाला असा तुंबला असून, हा नाला साफ करताना स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही कसरत करावी लागते.
• रस्त्यावरील धूळ कमी करण्यासाठी नगरपालिकने नशनल एअर क्लिनिंग प्रोग्राम अंतर्गत एक रोड स्वीपिंग मशीन खरेदी केली आहे.
सहा घंटागाड्याही वाढणा शासन निर्देशानुसार नगरपालिका शहर स्वच्छतेसाठी वाढीव सहा घंटागाड्या, एक कॉम्पेक्टर, दोन ट्रॅक्टर, तीनचाकी तीन घंटागाड्या पुषगार्ड, बेलिंग मशीन खरेदी करणा आहे. ही खरेदी प्रस्तावित असून, लवकरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे. यामुळे शहर स्वच्छतेच्या कामात मोट मदत होणार आहे.
….तरच मिळेल शहरवासीयांना दिलासा
• शिवाय आणखी वाढीव तीन रोड स्वीपिंग मशीन खरेदी केल्या जाणार आहेत. या मशीनमुळे शहरातील विविध मार्गावर उडणारी धूळ कमी होण्यास मदत होणार आहे.
शहरातील अनेक भागातील नाल्या तुंबल्या आहेत. थोडाही पाठ झाला की नाल्यातील पाणी रस्त्यावर येवून अनेकांच्या घरात जाते. रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहते. या पाण्यातून वाद शोधताना नागरिकांना जीवघेणी कसरत करावी लागते. अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याची नासाडी होते. असा प्रकार भविष्यात घडू नये यासाठी पालिकेने नियोजन करून नाल्यांचे पाणी वाहते केले तरच शहरवासियांना दिलासा मिळणार आहे.