दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-शिवकुमार बिरादार
मुखेड. पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी माननीय शंकर पाटील येवते यांनी नुकताच सेवानिवृत्त झाल्याबद्दल आज ७ मे २०२३ रोजी जन्मभूमी येवती येथे अनेक मान्यवर व गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न झालाआहे.
शंकर पाटील येवते हे सर्व सामान्य एका गरीब शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन सुद्धा हलाखीच्या परिस्थितीत ते प्रथम ग्रामसेवक म्हणून 1985 ला रुजू झाले आहे.
पुढे त्यांनी ग्रामसेवक ते विस्तार अधिकारी व मुखेड पंचायत समिती येथे सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून ते चांगल्या प्रकारे काम पाहिले असुन येथूनच ते 29 एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल मुखेड पंचायत समितीच्या वतीने मुखेड तहसील कार्यालयात ३ मे रोजी त्यांचा भव्य असा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला यावेळी मुखेड पंचायत समिती व तहसील कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
सहाय्यक गटविकास अधिकारी शंकर पाटील येवते हे येवती येथील रहिवासी असून सेवानिवृत्ती बद्दल गावकऱ्यांच्या वतीनेही त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा ७ मे रोजी जन्मभूमी येवती येथे घेण्यात आला. शंकर पाटील येवते हे मुळातच स्वभावाने शांत संयमी व सदा हसतमुखी आणि सर्वात मिळून विसरून वागणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
जीवनात काटकसर व बचत कशी करायची हे शंकर पाटील येवते यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. शंकर पाटील येवते हे येवतीचे माजी सरपंच विजयकुमार पाटील यांचे छोटे बंधू आहेत.
शंकर पाटील येवते यांनी आत्तापर्यंत विविध पदावर पारदर्शक अतिशय चांगल्या प्रकारे काम करून सेवानिवृत्त झाल्याबद्दल येवती येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ व सेवा सहकारी सोसायटी येवती यांच्या संयुक्त विद्यमाने मुखेड पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी शंकर पाटील येवते यांचा भव्य असा सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. व्यंकटेश भोसले तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीराम पाटील राजूरकर हे होते.
या कार्यक्रमाचे नियोजन माजी सरपंच विजयकुमार पाटील, व शिवाजी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक शिवाजी सुभेदार, काँग्रेसचे कार्यकर्ते ,शेख मैनोदीन, पंचायत समिती सदस्य प्रतिनिधी वसंत पाटील येवते, सेवा सोसायटीचे चेअरमन नारायण पाटील तारदरवाडीकर यांनी केले होते. यावेळी या कार्यक्रमाला विविध गावचे आजी-माजी सरपंच सेवा सोसायटी चेअरमन ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक मित्रमंडळी कार्यकर्ते राजकीय पदाधिकारी नातलग व गावातील नागरिकासह महिला वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक संजय गुरुजी बिचकुंदे यांनी केले