दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- कंधार तहसिल कार्यालयात,कँन्टीनमध्ये खासगी व्यक्ती, संघटनेचे पदाधिकारी हे निराधार व्यक्तींना चुकीचे माहीती देऊन, फाँर्म भरून देणे इ. कामासाठी पैसे मागुन त्रास देत आहेत.तरी यापुढे असे प्रकार तहसिल कार्यालयाच्या परीसरात, कँन्टीनमध्ये कोणी केल्यास त्यावर सक्त कारवाई केली जाईल.तसेच ग्रामीण भागातही असे प्रकार घडत असल्यास लाभार्थींनी कुणाच्याही भुलथापांना बळी पडुन नये. अशा व्यक्तींची सरळ पोलीस स्टेशनला तक्रार करावी.
तहसिल कार्यालयाकडुन ग्रामीण भागांत तलाठी व कोतवाल नियुक्त करण्यात आलेले आहेत त्यांचे व महाईसेवा केंद्राचे मार्गदर्शन घेऊन लाभार्थी, अर्जदाराने आपली कागदपत्रे,अर्ज इ. बाबत कार्यवाही करावी.स्वतःची कामे स्वतः करून सहकार्य करावे.कोणत्याही खाजगी व्यक्तीकडुन, संघटनाकडुन फसवणूक करून घेऊ नये.असे आवाहन तहसिल कार्यालय कंधारच्या वतीने करण्यात येत आहे.विशेष सहाय्य विभाग तहसिल कार्यालय कंधार