दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर’: देगलूर तालुक्यातील रेतीचे कुठलेही वाळू घाट चालू नसताना देगलूर शहरासह तालुक्यात रात्रीच्या वेळी अवैध रेती वाहतूक होत आहे, तरी शासनाचे हजारो रुपये ते महसूल बुडवत आहेत. राज्यशासनातर्फे 650 ब्रास रु प्रमाणे चालू होणार आहे. पण आजून पर्यंत काहीही महसूल विभागाकडून सुचना दिलेली नाही त्यामुळे वाळू माफिया देगलूर तहसिल समोरून व उपजिल्हाधिकारी कार्यालया समोरून बिन्धास्त रेती वाहतूक होत आहे. ट्रक व ट्रॅक्टर मध्ये व आइचर या मोठ्या वाहनामध्ये ताडपटरी झापून अवैध रेती वाहतूक होत आहे. तरी महसूल विभागाकडून व उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. काही सुझ नागरीक महसूल विभागाच्या नायब तहसिलदार यांना याबद्दल सांगत असताना कोणत्या ठिकाणी अवैध रेती वाहतूक होत आहे. तुम्ही आम्हाला सांगा आम्ही कारवाई करतो असे म्हणत आहेत पण कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. म्हणून जर अवैध रेती वाहतूक बंद न झाल्यास सामाजिक कार्यक्रर्ते अमोलकुमार शिंदे दि. 20/05/2023 रोजी पासून बेमुदत उपोषणास बसणार व त्याच्या जिवास काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी शासन प्रशासनाची राहील
असे त्यांनी सांगितले लवकरात लवकरअवधरेती वाहतूक होत असलेल्या वाहणावर कार्यवाही करुन अवैध रेती
बंद करण्यात यावी असे निवेदन तहसीलदार यांना सामाजिक कार्यकर्ते अमोलकुमार शिंदे यांनी दिली.