दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी-आकाश माने
अहंकार देऊळगाव येथे एकत्र आलेले साधक.
जालना तालुक्यातील अहंकार देऊळगाव येथे बौद्ध पौर्णिमा निमित्त कार्यक्रम घेण्यात आला. अहंकार देऊळगाव येथे असलेल्या बुद्ध भूमी विहार येथेबुद्ध वंदना घेऊन खीर दान करण्यात आली. यावेळी उपासक अमोल खरात, राजाराम खरात, ग्रापं सदस्य गोविंद खरात अंकुश सोमधाने, शाहीर राजू खरात, गायक राहुल खरात, बाकीलाल सरकटे युवराज खरात, राजरत्न खरात, प्रेम खरात, श्रावणी खरात, संस्कार खरात, तसेच गावातील उपासक आणि उपासिकांची उपस्थिती होती.