दैनिक चालु वार्ता पैठण तालुका प्रतिनिधी-गजानन ठोके
पैठण तालुक्यातील कोळी बोडखा सानपवाडी ग्रुप ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक तीन मधील एका रिक्त झालेल्या ग्रामपंचायत सदस्याच्या निवडीसाठी दिनांक 18 मे रोजी मतदान होणार असून तीन उमेदवार मैदानात उतरले आहे याबाबत अधिक माहिती अशी की कोळी बोडखा सानपवाडी ग्रुप ग्रामपंचायतच्या वार्ड क्रमांक तीन मधील खुल्या प्रवर्गातील महिलेचे पद रिक्त झाल्याने या ठिकाणी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला सदरील पद हे खुल्या प्रवर्गातील असल्याने पाच उमेदवारांनी आपले नामांकन पत्र भरले होते परंतु ऐनवेळी राजकीय तडजोडी करून दोन उमेदवारांनी आपले नामांकन पत्र मागे घेतल्याने तीन उमेदवार रिंगणात उतरले आहे
यात आदर्श ग्राम विकास पॅनल तर्फे श्री मनीषा अमोल सुवर्णकार या उमेदवार आहेत तर परिवर्तन ग्रामविकास पॅनल तर्फे श्री सुनिता प्रभाकर मगरे या उमेदवार आहेत व नव्याने स्थापन झालेल्या जनसेवा ग्रामविकास पॅनल तर्फे पार्वती महादेव ठोके ह्या आपले नशीब आजमावत आहे
गावात निवडणूक होणार असल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापलेले दिसून येत आहे तिन्ही पॅनलचे नेते आपला उमेदवार कसा योग्य आहे हे मतदारांना पटवून सांगत आहे तर उमेदवार मतदारांच्या भेटी घेऊन आपल्यालाच मत द्या अशी विनंती करीत आहेत ग्रामपंचायत सदस्याच्या पदासाठी होत असलेल्या या तिरंगी लढतीकडे सर्व गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे