दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
नांदेड/कंधार :- जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज येथील रिक्त पाच पदवीधर शिक्षकांची नेमणूक प्राथमिक शिक्षकांना विषयाप्रमाणे माध्यमिक शिक्षकांची दर्जोन्नती देऊन लवकरात लवकर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच मुख्याध्यापकांचे पद वर्ग -२ चे असल्यामुळे सदरील पद भरण्यासाठी शासनास कळविण्यात आले आहे. प्राथमिक पदवीधर विषय शिक्षकांची दर्जोन्नती दिनांक १५/०८/२०२३ पर्यंत करण्यात येईल त्याप्रमाणे रिक्त पदे भरण्यात येतील त्यामुळे दिनांक ०८/०५/२०२३ पासून चे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्या दालनासमोरील उपोषण मागे घेऊन शासनास सहकार्य करावे असे डॉ. सविता बिरगे शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नांदेड यांनी सर्व सामजिक कार्यकर्ते पेठवडज सर्कल यांना रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याचे मान्य केले असून लवकरच रिक्त पदे भरले जाणार आहेत.त्यामुळे जिल्हा परिषद हायस्कूल पेठवडज शाळेला पाच पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक मिळणार आहेत.