दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी -शिवकुमार बिरादार
मुखेड/ गेल्या अनेक वर्षापासून बहुजन चळवळीसह सामाजिक सांस्कृतिक,धार्मिक, राजकीय, अशा विविध क्षेत्रात सक्रिय सहभाग घेऊन अविरतपणे काम करणारे व गोरगरीब वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणारे बहुजन चळवळीचे नेते तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नांदेड जिल्हा समन्वयक दशरथ लोहबंदे यांच्या कार्याची दखल घेऊन नुकताच त्यांना स्वयंदीप फाउंडेशन च्या वतीने दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. सदर पुरस्कार वितरण सोहळा बौद्ध राष्ट्र भूतान येथे पार पडणार आहे.
लोहबंदे यांना पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. दशरथराव लोहबंदे यांनी शहरातील शेकडो गोरगरिबांना हक्काची जागा मिळवून देऊन त्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम केले आहे.तसेच शहरातील मध्यभागी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व पुतळा उभारण्यासाठी पुढाकार घेऊन त्यांच्या लोकसहभागातून काम पूर्ण केले आहे. त्याचबरोबर फुलेनगर येथे भगवान गौतम बुद्ध यांचा 100 फुटी बैठे पुतळा उभारला त्यामुळे त्या सर्व महत्वपूर्ण कार्याची दखल घेऊन लोहबंदे यांना स्वयंदीप फाउंडेशनी पुरस्कार जाहीर केला आहे.
लोहबंदे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुखेड कंधार विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार अविनाश घाटे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर, काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव डॉ. श्रावण
श्रावण रॅपनवाड, शिवसेना तालुकाप्रमुख नागनाथ लोखंडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष बोनलेवाड, डॉ. रणजीत काळे संजय अण्णा वेळीकर, किसान सेना जिल्हाप्रमुख शंकर पाटील लुट्टे, शिवाजी गेडेवाड सामाजिक, व राजकीय स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.