दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
सामाजिक बांधिलकी जोपासणारे व अनेक सामाजिक उपक्रम राबविणारे मिडिया पोलिस सोशल क्लबचे संस्थापक अध्यक्ष जेष्ठ पत्रकार तथा दैनिक समिक्षा चे संपादक रुपेश पाडमुख सर असुन आज दि.१६ मे रोजी त्यांचा वाढदिवस असुन त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा.
रूपेश पाडमुख सर यांचे कर्तृत्व व नेतृत्व लोकाभिमुख असुन त्यांनी दैनिक समिक्षाच्या माध्यमातून पत्रकारितेत ठसा उमटविला त्यांची शासन – प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्या दरबारात मोठे वजन आहे
. पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याची सुरुवात दैनिक पुण्यनगरी या वर्तमानपत्रात नांदेड प्रतिनिधी म्हणून केली. पुढे चालून त्यांनी आपले स्वतःचे वाचकमत दैनिक समिक्षा हे वर्तमान पत्र काढले तसेच त्यांनी मिमांसा फाऊंडेशन दैनिक समिक्षा यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविलेत यात रक्तदान हेच जीवदान वाचवी रुग्णांचे प्राण या प्रमाणे त्यांच्या वाढदिवसानिमित्त नांदेड येथे अनेक रक्तदान शिबिराचे आयोजन केले. वर्तमानपत्र विक्रेत्यांचा सत्कार केला. तसेच समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, पत्रकार यांना राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब, माजी मंत्री डी.पी. सावंत साहेब, विशेष पोलिस महानिरीक्षक आदींच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान केला.
तसेच त्यांनी म.रा.मराठी पत्रकार संघाचे १२ वर्ष नांदेड जिल्हा अध्यक्ष- सचिव म्हणून उत्कृष्ट पणे काम केले. म.रा. मराठी पत्रकार संघाच्या लोहा – कंधार तालुक्यासहित अनेक शाखा स्थापन केल्या. त्यानंतर त्यांनी आपली स्वतःची मिडिया पोलिस सोशल क्लब (पत्रकार संघ) संघटना स्थापन केली आहे या संघटनेचे कार्य ही जिल्ह्यात जोमात आहे . यंदा नांदेड येथील शासकीय विश्रामगृहाच्या सभागृहात सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कार देऊन सन्मानित केले व त्यांचा उत्साह वाढविला आहे.
ते पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढा देतात त्यांनी अनेक पत्रकारांना घडविले आहे.
आज दि १६ मे रोजी रुपेश पाडमुख सर यांचा वाढदिवस असुन ईश्वर त्यांना चांगले निरोगी आरोग्य देवो त्यांच्या हातून नियमित समाज सेवा घडो हीच वाढदिवसानिमित्त सदिच्छा.
विलास सावळे
मिडिया पोलिस सोशल क्लब तालुकाध्यक्ष लोहा