दैनिक चालु वार्ता चंद्रपूर जिल्हा उपसंपादक -दीपक कटकोजवार
चंद्रपूर शहरातील एम.डी.आर माॅल येथे चंद्रपूर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री आदरणीय नामदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने, महानगर भाजपा अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाच्या माध्यमातून #द #केरला #स्टोरी फिल्म चा लाभ चंद्रपूर महानगरातील 700 हून अधिक मुली व विद्यार्थीनींना दाखवण्यात आली. चंद्रपुरातील विद्यार्थीनींनी व मुलींच्या उत्स्फूर्त पणे चांगला सहभाग दर्शविला. मिराज थेटर मध्ये तिन्ही स्क्रीन हाउसफुल व चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी मुली व विद्यार्थीनींनी भारतीय जनता पार्टी , भारतीय जनता युवा मोर्चा व युवती मोर्चा प्रमुख यांचे आभार मानले.