दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
तालुक्यातील आथर्डी येथे श्री शनैश्वर जयंती उत्साहात दि. १९ मे रोजी साजरी करण्यात आली . गेल्या २३ वर्षा पुर्वी आथर्डी गावात अनंत चौधरी यांनी स्वखर्चातून या शनिदेवाची विधीवत पुजा करून स्थापना केली . त्या वेळे पासून दर वर्षी शनि जंयती दि. १९ मे रोजी विविध पूजा आर्चा करून च कार्यक्रमांनी उत्साहात साजरी करण्यात आली .
यावेळी शनैश्वर जयंती निमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे ,रात्रभर भजन ,किर्तन झाले . त्यानंतर आरती चे आयोजन करण्यात आले होते. दि. १९ रोजी सकाळी ९ वाजता महाआरती करून भाविकांना महाप्रसादाचे (अन्नदान ) करण्यात आले . यावेळी कळंब व वाशी परिसरातील शेकडो भाविक भक्तांनी शनि देवाचे मनोभावाने दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला .