दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे
मंठा वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या दुचाकी वाहणाची
दि.19 शुक्रवार रोजी मंठा पोलीसांच्या वतीने वाहनांची तपासणी करण्यात आली. ज्यामध्ये विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट व सायलेन्सर बदललेली वाहने चेक केली तसेच कागदपत्रे नसलेली वाहने असेएकुण 24 वाहने पोलीसांनी डिटेन केली. सदरील वाहनांवर मोटर वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली. ज्यामध्ये मोटरसायकल, स्कुटी, बुलेट, ईलेक्ट्रीक स्कुटर इ. वाहनांचा समावेश आहे
सदरील कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मंठा पोलीस ठाण्याचे पोलीस निररिक्षक संजय देशमुख, पो. उपनिरिक्षक. शिंदे, पो. उपनिरिक्षक. राऊत, दिपक आढे, झुंबडे, प्रशांत काळे, मदने, निळक, हराळ, मेखे ई. च्या वतीने करण्यात आली.