दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे
मंठा खरीप हंगाम ११दिवसावर येऊन ठेपला आहे. आता बि-बियाणे घेण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. कोणते बियाणे बोगस आहेत व कोणते बियाणे चांगले आहे. त्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याची गरज आहे. तालुक्यातील ग्राम पंचायत स्तरावर खरीप हंगाम पूर्व तयारी गाव सभा २०२३- २०२४ आयोजित करून सदर कार्यक्रमात गावामधील उपस्थित शेतकऱ्यांना मंडळ कृषी अधिकारी यांनी बीजप्रक्रिया, उगणक्षमता, पीक विमा, रोजगार हमी योजने अंतर्गत येणारे फळबाग, नाडेफ युनिट, गांडूळ खत युनिट, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजना तसेच विविध कृषी योजने विषयक योजनांची सविस्तर मार्गदर्शन गरज आहे.
कृषी पर्यवेक्षक यांनी पौष्टिक तृणधान्य याचा आहारातील महत्व तसेच पिकावरील किड रोग व नियंत्रण, पट्टा पद्धत, पद्धत, यंत्राने साह्याने पेरणी ,लागवड, बीज प्रक्रिया, युरिया ब्रिकेटचा महत्व व वापर, निंबोळी अर्क तयार करणे, जिवाणू खते व सेंद्रिय कीटकनाशके, हिरवळीच्या खते तसेच किटनाशक फव