दैनिक चालु वार्ता उस्माननगर प्रतिनिधी -लक्ष्मण कांबळे
नांदेड / शिराढोण :- कंधार तालूक्यातील शिराढोण येथे प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी श्री ष.ब्र.१०८ परम पूज्य वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या प्रेरणेने व आशिर्वादाने व श्री. ष.व्र.१०८ दिगंबर शिवाचार्य महाराज वसमतकर, श्री.ष.व्र. डॉ.बसवलिंग शिवाचार्य महाराज भालकी व श्री.ष.व्र. डॉ शभुलिग शिवाचार्य महाराज उदगिरकर यांच्या क्रपा आशिर्वादाने दि २१ मे ते २८ मे या कालावधीत शिवमंदिर शिराढोण येथे अखंड शिवनाम सप्ताह व परम रहस्यं पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
अखंड शिवनाम सप्ताहातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे ५ते ६ शिवपाठ सकाळी ८ते ११ परम रहस्यं पारायण, दु.१२ ते २ गाथा भजन सायंकाळी ५ते ६ शिवपाठ रात्री ९ते १२ शिव किर्तन व जागर होणार आहे यात नामवंत किर्तनकार दि २१ मे रोजी शि.भ.प. बालाजी महाराज पार्डी, दि २२मे शि.भ.प. विकास महाराज धसवाडीकर, दि २३मे शि.भ.प. सौं. संगीता सुभाष कहाळेकर,दि २४मे शि.भ.प.सौं. शिवकांताताई पळसकर,दि २५मे शि.भ.प. अमोल महाराज लांडगे बनवसकर,दि २६मे शि.भ.प.सोनबा गुरुजी शिराळे,दि २७ मे शि.भ.प. मन्मथ आप्पा डांगे गुरुजी टाळ आरती व रात्री किर्तन दि २८मे रोजी महाप्रसादाचे किर्तन ष.व्र. श्री श्री १०८ वेदातांचार्य दिगाबंर शिवाचार्य महाराज वसमतकर याचे होणार आहे तरी परिसरातील भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन विरशैव महिला पुरुष भजनी मंडळ व गावकरी यांच्या वतीने करण्यात आले आहे.