दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: दिनांक 23 मे 2023 रोजी आमदार जितेश भाऊ अंतापुरकर यांच्या निवासस्थानी युवक काँग्रेस पक्षाची बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीला उपस्थित देगलूर बिलोली मतदार संघाचे चे आमदार मा.जितेश भाऊ अंतापुरकर काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव देशमुख बळेगावकर, व जिल्हा उपाध्यक्ष प्रितम देशमुख हाणेगावकर, देगलूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मोगलाजी अण्णा शिरसाटवार,देगलूर बिलोली विधानसभा अध्यक्ष जनार्दन पाटील बिरादार दीपक शहाणे अभय देशमुख, महिला तालुकाध्यक्ष नंदाताई देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये कृष्णा गंटावार येरगीकर यांची युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली त्यांना पुढील वाटचालीसाठी दैनिक चालू वार्ता पेपर तर्फे मनःपुर्वक शुभेच्छा*देण्यात आले