दैनिक चालु वार्ता गंगापूर प्रतिनिधि -अमोल आळंजकर
गंगापूर : गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान या मुलीचा घातपात की अपघात झाला असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ माऊली शिवारात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनी कल्याणी अशोक लांडे (१७) ही २४ मे रोजी सकाळी रुक्मीणी कोचिंग क्लासेसला टिवीशन करुन घरी येणार होती परंतु दुपारी दोन ते तीन वाजे दरम्यान घरापासून दोन किलोमीटर अंतरावरील गंगापूर वैजापूर रोडवरील मांजरी फाट्याजवळ तिचा मृतदेह रस्त्याच्या कडेला आढळून आला तिच्या जवळ स्कुल बॅग असल्याची माहीती मिळताच गंगापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रकाश बेले, पोलिस ठाण्याचे प्रभारी सपोनी शाईनाथ गिते, पोलिस उपनिरीक्षक शकील शेख, दिपक औटी यांनी घटनास्थळी भेट देवून मृतदेह ताब्यात घेत येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला. सदर मुलीचा मृत्यू कशामुळे झाला? याविषयी माहिती मिळू शकली नाही.दरम्यान, अल्पवयीन मुलीचा घातपात की अपघात झाला हे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या घटनेचा उलगडा होईल. पुढील तपास पोलीस करत आहे उपजिल्हा रुग्णालय व पोलिस
स्टेशनमध्ये नातेवाईकांनी गर्दी केली होती