
दैनिक चालु वार्ता
नांदेड गोविंद पवार
लोहा,शासकीय विश्रामगृह येथे नुकतीच झुंजार क्रांती सेनेची बैठक पार पडली यात संघटनेचे अध्यक्ष ॲड.अनिल पाटील होळगे व सचिव गजानन चावरे यांच्या नेतृत्वाखाली पाराजी हंनवते यांची लोहा तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
ॲड.अनिल पाटील होळगे,सचिव गजानन चावरे यांनी
पाराजी हंनवते यांना निवडीचे नियुक्ती पत्र देऊन पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी नांदेड संपर्कप्रमुख कोंडीबा राजकौर, नांदेड दक्षिण जिल्हा उपाध्यक्ष केशव जाधव बामणीकर,नांदेड दक्षिण तालुका अध्यक्ष संतोष पाटील शिंदे,कंधार तालुका उपाध्यक्ष वैजनाथ स्वामी, हनुमंत होळगे,वडेपुरी संर्कलप्रमुख प्रकाश कंधारे, विनोद जमालपुरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.